नागपूरमहाराष्ट्र
Trending

विरोधकांची ही “शूट अँड स्कूट” अशी नीती दिसत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांची ही "शूट अँड स्कूट" अशी नीती दिसत आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑन आर.एस.एस.
गेले पंचवीस वर्षे नागपूर अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी येतात. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतो. हे स्थान आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे.जिथून राष्ट्रीयतेचे विचार घेऊन आम्ही देशात सर्वत्र काम करतो. त्या ठिकाणी ऊर्जा घेण्यासाठी आम्ही येतो.आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले असून भविष्यातला भारत कसा असेल याचा वेध घेणारा पुस्तक असून सर्वांनी तो वाचावा आणि पुढे त्या दिशेने काम करावं अशी अपेक्षा आहे.

ऑन कर्नाटक
आज मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर ठराव मांडतील.विश्वास आहे की एकमताने तो ठराव मंजूर होईल

ऑन उध्दव ठाकरे
काल बोलणाऱ्यांचे ( उद्धव ठाकरे ) मला आश्चर्य वाटले. अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, तेव्हा काहीच केलं नाही.सीमा प्रश्न काही आमचं सरकार झाल्यावर निर्माण झालेला नाही.महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तो प्रश्न आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे सरकार चालवणारे असे भासवत आहे, जसं हे सरकार आल्यावरच सीमा प्रश्न निर्माण झाला आहे.. असा राजकारण कधीच झाला नाही.. आम्ही विरोधात असतानाही सीमा प्रश्नावर सरकारच्या पाठीशी उभे राहत होतो.(केंद्रशासित प्रदेश करा) मागणी करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकतो. परंतु एवढे वर्ष हे का झालं नाही याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.

ऑन सत्तार स्कॅम
विरोधकांची ही “शूट अँड स्कूट” अशी नीती दिसत आहे.कुठलेही प्रकरण काढायचं आणि त्यावर गोंधळ घालायचं. मात्र उत्तर घ्यायचं नाही अशा पद्धतीचा त्यांचा धोरण आहे.ज्याला ते बॉम्ब म्हणत होते ते लवंगी फटाके ही नाही.आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहे. मात्र ते केव्हा काढायचे हे आम्ही ठरवू मात्र सध्या तरी यांचे लवंगी फटाके आम्ही पाहू.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button