महाराष्ट्रमुंबई

जीवन आनंद स्नेह संस्थेची स्थापना – नेत्रचिकित्सा विषयावर व्याख्यान – शिक्षकांबद्दल विशेष आदर

मुंबई जीवन आनंद स्नेह संस्थेचे उद्घाटन व स्नेह मिलन कार्यक्रम डीजी खेतान स्कूल सभागृह, मालाड, मुंबई येथे पार पडला.

मुंबई: मुंबई जीवन आनंद स्नेह संस्थेचे उद्घाटन व स्नेह मिलन कार्यक्रम डीजी खेतान स्कूल सभागृह, मालाड, मुंबई येथे पार पडला. प्रसिद्ध नेत्रवैद्य डॉ.श्याम अग्रवाल, आमदार व माजी मंत्री श्रीमती विद्या ठाकूर, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, मा. नगरसेवक दीपक ठाकूर, नेत्रतज्ज्ञ डॉ.आरती अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.एन.पांडे, कार्याध्यक्ष विजय शुक्ला, विनोद चौमल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुमारी सिया तोडी यांनी सरस्वती वंदना सादर केली.


प्रास्ताविक करताना डॉ.एन.एन.पांडे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. डॉ.श्याम अग्रवाल व डॉ.आरती अग्रवाल यांनी उपस्थित समाजाला डोळ्यांच्या आजारावरील उपचार व प्रतिबंध याबाबत माहिती दिली व महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षक डॉ. माधवी निघोस्कर, अधीर सिंग आणि श्रीमती रुपाली मिश्रा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रख्यात कवी आणि विनोदी अभिनेते महेश दुबे यांनी आपल्या कवितांनी उपस्थितांना खळखळून हसवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय सिंगदोडिया, राम स्वरूप शर्मा, राम अवतार तोडी, यांनी मोलाचे सहकार्य केले.


मंगल यादव, रमेश अग्रवाल व संदीप अग्रवाल आदींनी उल्लेखनीय कार्य केले. विजय शुक्ल यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार-कवी अभय मिश्रा यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button