नाशिकमहाराष्ट्र
Trending

साईबाबांच्या चरणी 28 लाखांचा मुकुट दान

साईबाबांच्या चरणी 28 लाखांचा मुकुट दान

वर्षेअखेरिस शिर्डी साईबाबा मंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. भक्त साईबाबांच्या चरणी लाखो रूपये दान करत असल्याचे आपण पाहिले आहे. यादरम्यान दरम्यान शिर्डीच्या साईबाबांना हिऱ्यांनी जडलेला सोन्याचा मुकुट दान आला आहे. युनायटेड किंगडम येथील इंग्लंडमधील साईभक्त कनारी सुबारी पटेल यांनी हा हिरेजडीत सुवर्ण मुकूट साईबाबांना दान दिला आहे. साधारणपणे साईबाबांना सोन्याचे मुकुट नेहमीच येत असतात, पण यावेळी बाबांना पूर्णपणे हिऱ्यांनी जडलेला मुकुट दान आला आहे.सोन्याच्या या मुकुटाचे वजन 368 ग्रॅम असून त्याची किंमत 28 लाख रुपये सांगीतली जात आहे. प्रत्येक आरतीच्या वेळी साईबाबांना मुकूट चढवण्याची प्रथा आहे . सुरुवातीच्या काळात चांदीचे मुकूट बाबांना चढवले जात असे, त्यानंतर सुवर्ण मुकूटांची रीघ साईंच्या दरबारी लागली अन् आता हि-याचे मुकूट बाबांना दान दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button