बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

सचिन खुस्पे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

विजय कुमार यादव

ठाणे – ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस सचिन खुस्पे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नविनर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्षांपासून सचिन खुस्पे हे कार्यरत होते. रामचंद्र नगर, संभाजी नगर, वैतीवाडी, साबळे वाडी, जिजामाता नगर आदी भागांमध्ये खुस्पे यांचा दांडगा जनसंपर्क आहे.सध्या ते राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणिसपदी कार्यरत होते. आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी अविनाश जाधव, रवींद्र मोरे हेदेखील उपस्थीत होते.

राष्ट्रवादीमध्ये संधी मिळत नसल्याने तसेच मराठी माणसांच्या हितासाठी राज ठाकरे हे कार्यरत असल्याने आपण राष्ट्रवादी सोडून मनसेचा झेंडा हाती घेतला आहे, असे खुस्पे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button