करमणूकक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

गुन्हे शाखे 9 ची कार्रवाई

जुगार खेळताना 12 महिला, 33 पुरुषांना अटक

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबई क्राईम ब्रँच 9 ने खार येथील एका सोसायटीवर छापा टाकून एकूण 45 जणांना जुगाराच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात 12 महिला आणि 33 पुरुषांचा समावेश आहे.

खार पश्चिम येथील आंबेडकर रोडवर असलेल्या ओम पॅलेस बिल्डिंगमध्ये जुगार सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 4 आरोपी व 41 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह 34 लाखांची रोकडही जप्त केली आहे.

सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम , अपर पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त काशिनाथ चौहान यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक, पोलिस निरीक्षक सचिन पुराणिक, दीपक पवार, सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वाझ, महेंद्र पाटील व पथकाने कार्रवाई केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button