बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

छगन भुजबळ यांच्याकडून देवना साठवण तलाव व मेळाच्या बंधाऱ्याच्या कामाचा आढावा

देवना साठवण तलाव व मेळाच्या बंधाऱ्याच्या कामाला गती द्या - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,

येवला, दि.२३ जून :-

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या देवना साठवण तलाव व मेळाच्या बंधाऱ्याच्या कामाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज नाशिक येथील कार्यालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button