महाराष्ट्रमुंबई

तुषार गांधी यांनी घेतली नसीम खान यांची भेट केले अभिनंदन… वर्षा गायकवाड यांनी घेतली नसीम खान यांची भेट….. भरघोस मताने निवडून आणण्याचे नसीम खान यांचे आवाहन

आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो आरिफ (नसीम) खान यांची त्यांच्या कार्यालयात त्यांच्या सहका-यासोबत भेट घेऊन नसीम खान यांचे अभिनंदन केले.

मुंबई: आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो आरिफ (नसीम) खान यांची त्यांच्या कार्यालयात त्यांच्या सहका-यासोबत भेट घेऊन नसीम खान यांचे अभिनंदन केले. देश वाचविण्याच्या लढाईमध्ये ज्या मजबुतीने आपण काम करत आहात त्या लढाईत मी देखील तुमच्यासोबत आहे असे अशी कबुली तुषार गांधी यांनी यावेळी दिली. त्यानंतर दुपारी महाविकास आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे काँग्रेस उमेदवार वर्षाताई गायकवाड यांनीही नसीम खान यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

वर्षाताई गायकवाड यांच्या सोबत झालेल्या भेटी नंतर नसीम खान यांनी चांदिवली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मोठ्या जोमाने प्रचार कार्यात सहभागी होऊन वर्षाताईंना भरघोस मतांनी निवडून आणून देण्याचे आवाहन केले. यावर वर्षाताई गायकवाड म्हणाले की नसीम खान यांचे गायकवाड परिवारांशी खूप जुने नाते असून ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असतो आणि असाच पुढेही राहणार आहे याची मला खात्री आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस सचिव बी एन संदीप आणि केरलाचे आमदार व प्रतोद अन्वर सदाहत सहित चांदिवली विधानसभेतील मुंबईचे प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, फ्रंटल सेलचे सर्व अध्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button