क्राईममहाराष्ट्रमुंबई

थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला क्राईम पोलिसांची मोठी कारवाई

थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला क्राईम पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे खारघर मधील एका रो हाऊसवर छापा टाकून, 16 नायजेरीयन व्यक्ती आणि जवळपास 1 कोटींच्या वर चरस, गांजा, एमडी सारखे अमली पदार्थ जप्त केले. रात्रभर सुरू असलेल्या या कारवाईत सापडलेल्या नायजेरीयन व्यक्ती आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली. आरोपींनी पळून जाण्याचा आणि पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी अतिरिक्त पोलिस फोर्स मागवून सर्व 16 नायजेरीयन ज्यात 10 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला पार्ट्या मध्ये विक्रीला आणलेले 1 कोटींच्या वर ड्रग्स जप्त करून, सर्व आरोपींना ताब्यात घेत. कोर्टाने त्यांची रवानगी तळोजा जेल मध्ये केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अजून अशा टोळ्या कार्यरत असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त करताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button