बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

नवीन वर्षात आमच्या बाजूने चांगलं चिन्ह लागलेलं दिसेल – संजय राऊत

नवीन वर्षात आमच्या बाजूने चांगलं चिन्ह लागलेलं दिसेल - संजय राऊत

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नात मध्यस्थी ही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी.
दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि कर्नाटकात सरकारच संपूर्ण भाजपच आहे.
मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री असे म्हणतात की अमित शहा यांना भेटून काही फायदा नाही , मात्र आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांना भेटून फायदा आहे.
हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना आहे.
या सीमा भागामध्ये कर्नाटकचे पोलीस धुडघुस घालत आहेत, तिथे राज्य पोलिस दलाचा फौज फाटा मागे करून सेंट्रल फोर्स पाठवावी हे केंद्रीय गृहमंत्री करू शकतात.
हा संपूर्ण सीमा भाग मायनॉरिटी खाली येतो मराठी लोक तिथे मायनॉरिटी खाली येतात.
त्यामुळे मराठी भाषा मराठी संस्कृती त्या संदर्भात अधिकार वाणीने आदेश देण्याचे काम हे गृहमंत्र्यांचा आहे.
खरंच गृहमंत्री मध्यस्थीचा काम करणार असतील आणि जर यातून सकारात्मक निर्णय होणार असतील तर यावर टीका करण्याचा कारण नाही.
गृहमंत्र्यांना आमचा आव्हान आहे गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी माणसावर अन्याय होत आहे. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्यावे.
गृहमंत्री हे महाराष्ट्राचे जावई आहेत.त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि आणि सीमा प्रश्न ही सगळ्यात जास्त झळ ही कोल्हापूरला बसते आहे.. त्यामुळे या प्रश्न संदर्भात त्यांना जास्त माहिती असणार.
न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? न्यायालय हे राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडू शकते .
कारण तो राजकीय प्रश्न होता.
मात्र वीस ते पंचवीस लाख मराठी लोकांचा प्रश्न ज्यावर न्यायालय तारखावर तारखा देत जर न्यायालयात राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो सरकारच्या इंटरेस्टचे प्रश्न सुटू शकतात.
मात्र सीमा प्रश्न असेल महाराष्ट्रच्या बेकायदेशीर सरकारचा प्रश्न असेल त्यावर तारखा तारखा येतात त्यामुळे संशय निर्माण होतं
अधिवेशनात सीमा प्रश्नावरती ठराव झाला नाही तर कोणत्या प्रश्नावरती होणार ? विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये या संदर्भात सरकारला जाब विचारला जाईल.
चीनची लोक तवांग मधून घुसले त्यांना आपण परत पाठवलं हे ठीक आहे. पण वारंवार चीनचे लोक इकडून तिकडून घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपले सरकार नेहमीप्रमाणे खापर पंडित नेहरूनवर फोडत आहे.
सीमा संरक्षण त्या त्या वेळेच्या सरकारने करायला हवा.
आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो हे आताच्या सरकारने पहावं.
नवीन वर्षात आमच्या बाजूने चांगलं चिन्ह दिसेल लागलेलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button