क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

प्रवाशांची लूट करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रवाशांची लूट करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उल्हासनगर रेल्वे स्थानकात अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या बाजूला पटरीवर उतरवून तक्रारदार हे लघुशंका करत होते. यावेळी चार इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांना दमदाटी करू लागले. एकाने चाकू दाखवत त्यांना धमकावले. तक्रारदाराच्या जवळ असलेला मोबाईल हिसकावून घेण्यात आला तसेच रोख रक्कम सुद्धा काढुन घेण्यात आली. यासंदर्भात चार संशयित इसमांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यापैकी तीन आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. रोहित मुकेश तेजी उर्फ रीतीक ( वय 21), लखन मनोहर गायकवाड ( वय 22), दीपक लक्ष्मण वासकर उर्फ पांड्या ( वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी उल्हासनगर येथे राहणारे आहे. यापैकी रोहित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. तर लखन गायकवाड याला देखील अगोदर अनेक गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button