बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

कल्याण मध्ये लव जिहादच्या विरोधात मशाल रॅली

कल्याण मध्ये लव जिहादच्या विरोधात मशाल रॅली

श्रद्धा वालकर तरुणीचा मारेकरी प्रियकरला फाशी द्या व लव जिहाद विरोधात कडक कायदे करा

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज कल्याण मध्ये हिंदू संस्कृती मंच तर्फे मशाल रॅली काढण्यात आली ही मशाल रॅली कल्याण पूर्व येथील खडे गोलवली ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आली असून या मशाल रॅली त शेकडो महिला पुरुष लहान मुले व इतर सामाजिक संघटनेने ही सहभाग घेतला होता. यावेळी महिलांनी हातात मशाल घेत लव जिहादच्या विरोधात नारेबाजी करत श्रद्धा वालकर या तरुणीचा मारेकरी प्रियकर आफताब पूनावाला याला फासी द्या किंवा गोळी झाडून मारा त्याचबरोबर लव जिहाद मध्ये मोठ्या प्रमाणात मुलींचे बळी जात असून कडक कायदा काढावा, अशी मागणी या आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आली. तर यापुढे कॅण्डल मार्च निघणार नाही तर महिला व तरुणी हातात मशाल घेऊन यांचा सामना करतील असाही इशारा महिलांकडून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button