महाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

मौजे दरे येथील ‘बांबू मूल्यवर्धन केंद्र’ आणि ‘टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे’ लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

सातारा दि.९:- मौजे दरे येथील ‘बांबू मूल्यवर्धन केंद्र’ आणि ‘टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे’ लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

दरे तालुका महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.

सह्याद्री पर्वतरांगातील शेतकऱ्यांसाठी टरस रेशीम शेती वरदान ठरेल

टरस (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरनग करायचे नाही,पाण्याचे आवश्यकता नाही,औषध फवारणीची आवश्यकता नाही, त्यामुळे सह्याद्रीपर्वत रांगांमधील शेतकऱ्यांसाठी टरस रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख,उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button