महाराष्ट्रमुंबई

आंतरमहाविद्यालयीन श्लोक पठण स्पर्धा

श्री. नरसिंह के. दूबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संस्कृत- संहिता-सिद्धांत विभागाने आज दि.

मुंबई

श्री. नरसिंह के. दूबे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संस्कृत- संहिता-सिद्धांत विभागाने आज दि. 23 मार्च 2024 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व संस्थापक प्राचार्य दिवंगत वैद्य मोरेश्वर डी. वैद्य यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आंतरमहाविद्यालयीन श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन केले. महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांना श्लोक पठण स्पर्धेचे आमंत्रण पाठविण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेकरिता दोन गट नियोजित केले होते प्रथम व द्वितिय वर्ष आयुर्वेद विद्यार्थी यांचा गट ‘A’ आणि तृतीय व चतुर्थ वर्ष आयुर्वेद विद्यार्थी यांचा गट ‘B’. ज्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयातून एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन व श्रद्धांजली सभेची सुरुवात झाली. उद्घाटन समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दूबे , संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ओम प्रकाश दुबे ; संस्थेच्या विश्वस्त आणि प्रसूति तंत्र व स्त्रीरोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रोफेसर ऋजुता दुबे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रोफेसर हेमलता शेंडे, सर्व आमंत्रित निर्णायक, महाविद्यालयाचे सर्व अध्यापक आणि विद्यार्थी तसेच महाराष्ट्रभरातील स्पर्धक उपस्थित होते. ईश पूजन, स्तवन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैद्य.कीर्ती मंदार देव आणि वैद्य. चंदाराणी बिराजदार हया श्लोक पठण स्पर्धेचे परीक्षक, तसेच महाविद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांनी वैद्य सरांबद्दलच्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ.ओमप्रकाश दुबे यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि वैद्य सरांबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

​सकाळी अकराच्या सुमारास आंतर महाविद्यालयीन श्लोक पठण स्पर्धेला सुरुवात झाली. आचार्य श्री दामोदर त्रिपाठी, व्याकरण विभाग अध्याक्ष, जीटी संस्कृत महाविद्यालय, मुंबई; प्राध्यापिका रेणुका पांचाळ, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ; वैद्य चंदाराणी बिराजदार आयुर्वेद सिद्धान्त व दर्शनशास्त्र तज्ञ तसेच प्रख्यात आयुर्वेद चिकित्सक, बोरिवली आणि वैद्य कीर्ती देव प्रख्यात आयुर्वेद चिकित्सक, ठाणे हे सर्व मान्यवर श्लोक पठण स्पर्धेचे परीक्षक होते.
स्पर्धा दुपारच्या जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणानंतर अशा दोन सत्रात घेण्यात आली. सायंकाळी ५.०० च्या सुमारास समापन समारंभ सुरू झाला. परीक्षकांनी स्पर्धेबद्दलचे त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना पुढील सुधारणांसाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दूबे यांच्या हस्ते सहभागी प्रत्येक गटाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तसेच उत्तेजनार्थ बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
Prize
Group A
Group B
Prize detailed for each group
प्रथम

सिद्धी गारुडी
(SNKD ट्रस्ट नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज, नालासोपारा)
समृद्धी भारत पटाईत (आर.ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, वरळी)
रु.3100/- रोख
ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
द्वितीय

कृतिका थळे
(Y.M.T. आयुर्वेद मेडिकल कॉलेज, खारघर)
सुरेल विनायक भिडे (SNKD ट्रस्टचे नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज, नालासोपारा)
रु.1100/- रोख
ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
तृतीय

ऋतिक लोहार (डी. वाय. पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आयुर्वेद नेरुळ))
मिती दिलीप जोशी (SNKD ट्रस्टचे नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज, नालासोपारा)
रु.3100/- रोख
ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ 1
ईश्वरी बोरकर (डी. वाय. पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आयुर्वेद नेरुळ)
……………
रु.501/- रोख
प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ 2
पूजा जाधव (SNKD ट्रस्टचे नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज, नालासोपारा)
…………….
रु.501/- रोख
प्रमाणपत्र

​स्पर्धेच्या दोन्ही गटांचे संचालन डॉ. तेजश्री दळवी, सहाय्यक प्राध्यापिका, रोग निदान विकृती विज्ञान विभाग, डॉ. राहुल सोनकांबळे, सहाय्यक प्राध्यापक, स्वस्थवृत्त विभाग आणि डॉ. नीलेश तिवारी, सहायक प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग यांनी केले

उद्घाटन समारंभ आणि श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन संस्कृत-संहिता- सिद्धांत विभागाच्या प्रमुख डॉ.ज्योती राठी यांनी केले. संस्कृत-संहिता- सिद्धांत विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सर्वेश शर्मा यांनी स्पर्धेच्या सुरळीत संचालनाचे निरीक्षण केले. संस्कृत-संहिता- सिद्धांत विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शुभांगी पाटील यांनी समारोप व परितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन केले, तर आभार आचार्य आशुतोष मिश्र,सहायक प्राध्यापक, संस्कृत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button