मुलींच्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून धुळ्यात सुरुवात
मुलींच्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून धुळ्यात सुरुवात
धुळे –
धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज मुलींसाठी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. 900 हुन अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडत आहे. आज एक तृतीयपंथी उमेदवार देखील हजर झाले होते. त्यासोबत माजी सैनिक यांची देखील मैदानी चाचणी पार पडणार आहे.संपूर्ण राज्यत पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे. मुलांची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर, आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली.
धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज 7.6 अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील मुलींची गर्दी ही लक्षणीय होती. 900 हुन अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडत आहे. यावेळी मुलींचा उत्साह पाहायला मिळाला तसेच जळगाव येथून आलेल्या एका तृतीयपंथी उमेदवाराचा देखील यात समावेश होता, मात्र राज्य शासनाने अद्याप कोणतेही मैदानी चाचणी बाबत तृतीयपंथीयांचे निर्देश दिलेले नसल्याने कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून लवकरच शासनाने आमच्याही मैदानी चाचणीचे निर्देश द्यावे अशी विनंती तृतीयपंथी उमेदवार असलेल्या जोगी यांनी यावेळी केली.
बाईट- संजय बारकुंद (पोलिस अधीक्षक, धुळे)
बाईट- उमेदवार
बाईट- तृतीयपंथी उमेदवार