सोलापुरातील आसरा पुलाजवळील एका साडी दुकानातील एसीला आग लागली. लागलेली आग विझवण्यासाठी मालक आणि कर्मचाऱ्यांनी अग्निशमक यंत्रणेचा शोध घेण्यासाठी आजूबाजूला गेले. त्याच दरम्यान आगीने भडका घेत मोठी आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले. एन.जी. मिल हौसिंग सोसायटी येथील एका साडीच्या दुकानात एसीजवळ आग लागली.यातून आगीचा भडका उडाला.ही माहिती अग्निशामक दलाला कळताच त्यांनी तात्काळ कार्यवाही करत दोन गाड्या पाणी मारून संपूर्ण आग विझवली. अग्निशामक दलाच्या त्वरित कार्यवाहीमुळे पहिल्या मजल्यावरील शेजारी असलेले गोडाऊनला आणि आगीपासून कोणताही धोका पोहोचला नाही. आगीमध्ये एसी, कॉम्प्युटर, सारीज, वायरिंग, अंडर गारमेंट इत्यादी साहित्य जळाले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक अच्युत दुधाळ, होटगी हेड केंद्रातील जवान बुधवंत, मुर्शद, वाघमारे, उमराणे, गोरख सुतार, गोमे, भडकवाड, होटगीकर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close