करमणूकक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलसोलापूर
Trending

मुंबई गुन्हे शाखे 9 ची कार्रवाई

एमडी बनवणारा कारखाना पकडला 100 कोटी रुपयांचा माल जप्त

श्रीश उपाध्याय

मुंबई

एमडी ड्रग्जच्या मोठ्या धंद्याचा पर्दाफाश करत मुंबई क्राईम ब्रँच 9 ने सोलापुरात एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना जप्त केला असून एमडी बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त केले असून त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अतुल गवळी आणि राहुल गवळी या दोन आरोपींना कार्टर रोड, वांद्रे येथील खार दांडा परिसरातून 1089 ग्राम एमडी सह अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत 10 कोटी 17 लाख 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी सोलापूर, चिंचोली एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कारखान्यावर छापा टाकला. छाप्यादरम्यान कारखान्यातून सहा कोटी रुपये किमतीचे तीन किलो एमडी सापडले. याशिवाय कारखान्यात एमडी बनवण्याचे रसायन सापडले असून, त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.

सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई, यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक , पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, दीपक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वाजे, महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुभाष शिंदे, सुनील म्हाडसंक, प्रशांत साळवी, स्वप्नील गुरुव आणि पथकाने ही वरील कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button