जालना येथून तिरुपती बालाजी साठी साप्ताहिक रेल्वे सुरु
जालना येथून तिरुपती बालाजी साठी साप्ताहिक रेल्वे सुरु
जालना ते तिरुपती बालाजी या साप्ताहिक रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला आहे.
जालना सह संपूर्ण मराठवाड्याला या रेल्वे सेवेमुळे तिरुपती बालाजीला जाणे सुलभ होणार असून, यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना आनंद झाला आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांची तिरुपतीला रेल्वे गाडी सोडण्याची मागणी पूर्ण झाली आहे. सदरील रेल्वे जालना मार्गे परळी, बिदर, हुमनाबाद, रायचूर आणि तिरुपती अशी धावणार आहे. या रेल्वेमुळे मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकांक्षा या रेल्वे गाडीमुळे पूर्ण होणार आहे.
ही रेल्वे सुरू होण्यापूर्वी मराठवाडा विभागातून तिरुपती पर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत, मात्र यात्रेकरू प्रवाशाची वाढती संख्या पाहता या भागातून जादा रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी होत होती या अनुषंगाने प्रवासासाठी सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जालना ते तिरुपती जाण्यासाठी एलएचबी कोच असलेली साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात येत आहे. सुरुवातीला ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या महिन्यात सहा फेऱ्यासाठी जालना येथून रविवारी ११.५० वा व सोमवारी ०९.०५ वा हि रेल्वे गाडी तिरुपतीला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने सदर रेल्वे गाडी मंगळवारी १८.३० वा सुटेल आणि बुधवारी १८.०० वा जालना येथे पोहोचणार आहे.
यावेळी आ.नारायण कुचे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे, भाजपा शहराध्यक्ष ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आशोक आण्णा पांगारकर, घनशामसेठ गोयल,आदिंची उपस्थित होती.
बाईट – रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री