महाराष्ट्रमुंबई

विकसित भारत मुंबईकरांना कसा हवा? मुंबई भाजपा संकल्प पत्रासाठी 2 लाख सूचना गोळा करणार

विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-आकाशांचे चित्र उमटावे म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकरांकडे जाऊन 2 लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा

विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-आकाशांचे चित्र उमटावे म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकरांकडे जाऊन 2 लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी

भाजपा तर्फे आजपासून देशभर १५ मार्च पर्यंत “संकल्प पत्र अभियान” राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीचा भाजपाचा जाहीरनाम्यासाठी या सूचना मागवण्यात येत आहेत.
या विकसित भारत संकल्प पत्रासाठी देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवल्या जात आहेत.समाजाच्या सर्व घटकांमधून या सूचना संकलित केल्या जाणार आहेत. विविध औद्योगिक, सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. या मोहिमेत मुंबईतील मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आघाडीवर असतील ते मुंबईकरां पर्यंत जाऊन या सूचना गोळा करणार आहेत.
मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन व सार्वजनिक ठिकाणी सूचना पेटी ठेवण्यात येणार असून सोबतच भाजपाचे पदाधिकारी घरोघरी जाऊनही या सूचना गोळा करणार आहेत.
यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, शिक्षक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल्स, व्यापारी, गायक, अभिनेता, खेळाडू, अभियंते, माजी सैनिक, पत्रकार इत्यादीं मान्यवर घटकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक लोकसभा विधानसभा क्षेत्रातून संकलन पेटीच्या माध्यमातून सूचनांचे संकलन केल्या जाणार असून त्यासाठी एक खास संकल्प पेटी तयार करण्यात आली आहे.

तसेच 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन संकल्प पत्राच्या सूचना रेकॉर्ड करता येणार असून हा नंबर ही मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपा हे अभियान राबविणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “नमो ॲपवरून” सूचना पाठविता येतील, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशाच्या निवडणूकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांची मते, अपेक्षा, सूचना घेण्याची ही पहिलीच वेळ असावी असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button