मुंबई

Ashish Shelar : चार सदस्यीय प्रभाग रचनाही “नगरराज बिलाला” अपेक्षितच, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार

मुंबई महापालिका वगळून राज्यातील नगरपालिका महानगरपालिकांची प्रभाग रचना चार सदस्यीय करणारा कायदा म्हणजे देशाच्या "वन नेशन वन इलेक्शन" या संकल्पनेसह नगर राज बिलाला बढावा देणाराच आहे, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मांडली.

विधानसभेमध्ये आज सन 2014 विधानसभा विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक संमतीसाठी मांडण्यात आले होते. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातील अन्य नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये चार किंवा पाच सदस्य प्रभाग रचना करण्याचा असा बदल सुचवण्यात आला आहे. या बदलाला मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाठिंबा दिला आणि हा बदल योग्य असून असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान मिशन या अंतर्गत “नगराज बिल” आणण्यात आले होते, या नगरराज बिल अंतर्गत वाँर्ड मध्ये
बुथ पर्यंतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. त्या संकल्पनेला हा आज करण्यात आलेला बदल हा अधिक बळ देणार आहे, असे मत आशिष शेलार यांनी मांडले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक लोकप्रतिनिधींना संधी देण्याची गरज आहे, जनमानसाच्या सेवेसाठी अधिक लोकप्रतिनिधी असावे, असे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे आजपर्यंत तीन सदस्य प्रभाग समिती होती त्यामध्ये एक सदस्याची वाढ करून ती चार सदस्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, हा लोकशाहीला बळकटी देणाराच आहे, असे मत त्यांनी मांडले.
न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे.

याची सुनावणी होत असताना, जर न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा राज्याचा कोठा काय ? असं राज्य सरकारला विचारले तर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सरकारला सादर करावे लागेल तत्पूर्वी राज्यातील एकूण जागा किती याची निश्चिती सरकारकडे असली पाहिजे, आणि त्यामुळे हे बिल आज मंजूर केल्यास राज्यातील एकूण जागांची संख्या निश्चित होणार आहे व ओबीसी आरक्षणाचा कोटा ठरवण्यास मदत होणार आहे त्यामुळे हे बिल योग्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच केंद्र सरकारने खालच्या पातळीपर्यंत जाऊन सामान्य माणसाला सेवा सुविधा मिळाव्या व सुलभता यावी अशी कल्पना मांडली असून या देशात वन नेशन वन इलेक्शन कल्पना मांडली गेली असून राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आली आहे त्याला बढावा देणाराचा हा बदल असल्याचे त्यांनी नमूद केले.

तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?

कोविड नंतर संसदेचे कामकाज झाले पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज होत नव्हते, लक्षवेधी होत नव्हत्या, प्रश्न उत्तरे होत नव्हती, विधेयकांवर चर्चा होत नव्हती, आमदारांना प्रश्न विचारता येत नव्हते, मग त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती का ? असा थेट सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.
आज लोकशाही धोक्यात आली असा आरोप करणाऱ्या भास्कर जाधव यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की, भास्कर जाधव यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button