क्राईममहाराष्ट्रमुंबई

माफिया सरगना छोटा राजनच्या गुंडाला देशी पिस्तुलासह अटक

माफिया सरगना छोटा राजनच्या गुंडाला देशी पिस्तुलासह अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई गुन्हे शाखा 3 ने माफिया सरगना छोटा राजनचा गुंड शाम पांडुरंग तांबे उर्फ ​​सॅव्हियो रॉड्रिग्स याला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे.
वरळीतील कृष्णा हॉटेलजवळ छोटा राजनचा एक साथीदार येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 3 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे सापडली. शाम विरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखा 3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button