मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई
दीड कोटींच्या अमली पदार्थांसह ६ आरोपींना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिट आणि बांदा युनिटने दोन वेगवेगळ्या गुन्ह्याखाली एकूण 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
वांद्रे एएनसीने काश्मीरमधून चरस आणून मुंबईत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून 2 किलो 600 ग्रॅम काश्मीर चरससह 3 आरोपींना अटक केली आहे.
वांद्रे एएनसीने हाजी अब्दुल रहमानला चरस रॅकेटमध्ये पकडले तो जम्मू-काश्मीरमधून मुंबईतील सरताज आणि कन्नौजिया यांच्यामार्फत व्यवसाय चालवत होता.
अन्य एका कारवाईदरम्यान आजाद मैदान यूनिटने घोडपदेव येथून एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीच्या आधारे अन्य दोन आरोपींना दो टाकी भाग आणि नागपाडा येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीकडून २४ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार वांद्रे एएनसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चौहान, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.