बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मविच्या काळात दोन मंत्री जेलात, सत्तेच्या लाचारीपोटी उद्धव ठाकरेंची तोंडावर चिकटपट्टी,

देवेंद्र फडणवीसांच्या पुरूषार्थाचा आदर्श घेणार का ?

2019च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मतदारांनी दिला. केवळ मुख्यमंंत्री पदासाठी तत्कालीन काळात शिवसेनेने भाजपाची साथ सोडली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सलगी करत उद्धव ठाकरे राजसिंहासनावर बसले. राज्याचा कारभार करताना मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले नाहीत. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना विधानसभा सभागृहात त्यांना उघडे पाडले. राजीनामा मागितला. कारण प्रख्यात दहशतवादी दाऊद इब्रााहिम यांच्या कुटुंबियासोबत त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे पुराव्यासहित सादर केले. पण धृतराष्ट्राच्या भुमिकेत ठाकरे वागले. त्यांनी राजीनामा तर सोडाच उलट खंबीरपणे पाठराखण केली. नवाब मलिक तात्पुरत्या जामिनवर आहेत, राजकिय समीकरण बदलले, राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली. दोन्ही पक्ष 99 टक्के भाजपसोबत सत्तेत आहेत. नवाब मलिक सत्ताधा­यांच्या सोबत नाहीत पण अजितदादा गटासोबत येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेत लेखी पत्र देवुन सत्ताधारी सहका­यांना ठणकावुन सांगितले की आम्हाला सत्तेपेक्षा राष्ट्रहित महत्वाचे. तुम्ही त्यांना सोबत घेवु नका. खरं तर पुरूषार्थाहुन पुरूषार्थ म्हणावा लागेल.कारण सत्तेसाठी लाळघोटेपणा करणारं राजकारण पाहिलं तर दुसरीकडे सत्ता महत्वाची नाही तर राष्ट्र आणि समाजहित महत्वाचं सांगणारा संदेशच कृतीतून दिला.

खा.संजय राऊत यांना असं वाटतं की आपलं सुंब आडवं जळतं, उभं जळतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही काही घडलं तरी हा माणुस तमाशा केल्याशिवाय रहात नाही. कधी भाजपावर टिका तर कधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर हल्ला. कुठलाही संदर्भ कुठे लावायचा आणि राजकारण बिघडुन टाकायचं हा धंदा मागच्या पाच-सहा वर्षात राऊतांनी केला. ज्या राऊतांमुळे उद्धवजींना हिंदुत्व बाशनात गुंडाळावं लागलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या काँग्रेसवाल्यांनी शिव्या दिल्या, अपमान केला त्यांनाच मातोश्रीवर पायघड¬ा टाकण्याचे काम राऊतांच्या मध्यस्थीने ठाकरे कुटुंबियांना करावं लागलं. खरं तर वर्तमान महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेला तमाशा पाहिल्यानंतर सर्वस्वी कारणीभुत संजय राऊत नावाचा माणुस असं म्हटलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. पान पडलं पिंपळगाव जळालं. ही त्यांची कला स्वत:ला आपण खुप काही करतो असं वाटत असलं तरी गलिच्छ राजकारणाचा आदर्श त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवला हे मात्र नक्की. शरदचंद्र पवार युपीएचं नेतृत्व करू शकतात असं एकेकाळी राऊतांनी ठणकावुन सांगताना दुसरीकडे राहुल गांधीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही असं सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान होवु शकतात, वारंवार अशा प्रकारे संदिग्ध वक्तव्य करत केवळ प्रसिद्धीसाठी सारा बहाणा असंच म्हणावे लागेल. जरा मागे वळुन पाहिलं तर बावीस वर्षाची भाजपा-शिवसेना युती तोडण्यासाठी हेच कारणीभुत. 2019 ला जनादेश महायुतीसाठी होता. कुणाच्या दारात भीक मागण्याची गरज मतदारांनी ठेवलीच नव्हती. पण मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत गद्दारी वेगवेगळे रंग लावुन केली आणि थेट बारामतीकरांच्या दावणीला हिंदुत्वाचा भगवा टांगुन ठेवला. तदनंतर काय घडले?वेगळं सांगण्याची गरज नाही. कर्माची फळं भोगताना ओरीजनल शिवसेनेतच खिंडार पडली. एकनाथ शिंदे रूपाने तब्बल 40 आमदार बाहेर पडले. वास्तविक पहाता एवढी घडामोड घडल्यानंतर संजय राऊतांनी तर राजकिय संन्यास घ्यायला हवा होता. राष्ट्रवादी पक्षात देखील उभी फुट पडली. अजितदादांच्या रूपाने पुन्हा 40 पेक्षा जास्त आमदार सत्ताधा­यांसोबत आले. राजकिय घडामोडी भाजप सोडून दुस­या पक्षात एवढ¬ा घडल्या की कोण कुणासोबत आहे? आणि कुठे गेलं? अंदाज कुणालाच लागेना. नागपूरात हिवाळी अधिवेशन चालु आहे.त्यात जामिनवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले. भाजप नेत्यांचा तिळपापड होणं साहजिकच. अजितदादांनी कुणाला सोबत घ्यावं? आणि कुणाला नाही? तो त्यांचा विषय आहे. कारण ते काही भाजपमध्ये नाहीत. ते ओरीजनल राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणावे लागतील. रोज आमदार कोण कुठे जातो? यावर कडवी नजर असताना मलिक कदाचित त्यांच्या गळाला लागले असतील पण ज्या मलिकांच्यावर महाविकास आघाडी सरकार असताना देवेंंद्र फडणवीसांनी पुराव्यासहित विधानसभेत आरोप केले आणि सिद्ध झाले. दहशतवादी दाऊद इब्रााहिम यांच्या कुटुंबियांच्या सोबत खरेदी विक्रीचे व्यवहार ज्याचा तपाश अजुनही सुरू असुन मलिकांना तत्कालीन काळात जेल झाली. केंद्रिय तपास यंत्रणेमार्फत तपास झाल्याने मंत्री जेलमध्ये गेले. दुसरे मंत्री अनिल देशमुख यांच्यावरही 100 कोटीचा आरोप वरिष्ठ पोलीस अधिका­यांनी केला. त्या चौकशीत देशमुखही जेलमध्ये गेले. मंत्री पदावर असताना तुरूंगात डांबुन देखील तत्कालीन काळात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतलाही नाही नव्हे त्यांना मंत्रीमंडळातून काढुन टाकले नाही. आज नाकाने वांगे सोलणारे पुरूषार्थाची भाषा अग्रलेखातून करणारे यांनी थोडं मागे वळुन पहाण्याची गरज वाटते. भाजपाने समाजहित आणि राष्ट्रहितावर कधीच तडजोडी केलेल्या नाहीत आजवरचा इतिहास आहे. सत्ता असणं वेगळं आणि पक्षाचं तत्वज्ञान वेगळं. नवाब मलिकांना आमच्यासोबत घेवु नका सत्तेपेक्षा आम्हाला राष्ट्रहित श्रेष्ठ वाटते असं पत्र उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीसांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देवुन लेखी स्वरूपात ठणकावुन सांगितले. ही हिंमत केवळ फडणवीसांच्याच अंगी होती. हा खरा तर पुरूषार्थी बाणा म्हणावा लागेल. आजवरच्या इतिहासात सत्ताधा­यांनी सहका­यांना अशा प्रकारे सांगणं तथा लेखी इशारा देणे कधीच घडलं नव्हतं. मात्र भाजपमध्ये आम्ही अयोग्य गोष्टी पाठीशी कधीच घालु शकत नाहीत. नवाब मलिकाचं काय करायचं ते तुम्ही ठरवा पण भाजपासोबत सत्तेत सहभागी नको असं ठणकावुन सांगितलं. खरं तर विरोधकांनी पत्राचं स्वागत करायला हवं होतं. वैचारिक पातळीवर राजकारण जेव्हा लोक करतात तेव्हा तात्वीक गोष्टीची तुलना करायलाच हवी. स्व.बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भुमिकेचे स्वागत करून अभिनंदनाचा फोन केला असता. पण वारसदार केवळ राजकारणातला विरोधासाठी विरोध म्हणुन भुमिका निभावतात. बुडाखालुन पाणी वाहुन गेल्यानंतर जागे होतात. सत्तेसाठी रातआंधळेपणा मातोश्रीच्या भोवती फिरला परिणामी शिल्लक राहिलेल्या ठाकरे शिवसेनेचे हाल आज होताना दिसतात. शिवसेना पुन्हा जोमाने उभा राहिल का नाही? येणारा काळ ठरवेल पण असे संपादक जे संपादकीय पदावर नाहीत त्यांच्या केवळ नाममात्र बुद्धीने वैचारिक लढा ठाकरे शिवसेना लढवत असेल तर शिल्लक शिवसेना रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. प्रश्न एकच पडतो की, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तेव्हा दोन मंत्री तुरूंगात गेले तरी देखील राजीनामा मागण्यासाठी किंवा त्यांना मंत्रीमंडळातून काढण्यासाठी तोंडाला चिकटपट्टी का बांधली होती? त्याचीच दुसरी बाजु आम्हाला सत्ता चालवताना राष्ट्र आणि समाजहित महत्वाचं. देशद्रोही लोकांच्यासमोर आम्हाला योग्य वाटत नाही. हे ठणकावुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी लिखित बाँड दादाला पाठवला. तेव्हा याच राज्यातील सुज्ञ जनतेने भुमिकेचे स्वागत केले. केवळ सत्तेसाठी लाळघोटपणा करायचा, विचार आणि तत्व समुद्रात फेकुन उपभोग्य भुमिकेत वागणं हे फक्त त्यांनाच जमेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button