क्राईममुंबई
Trending

जुन्या वैमनस्यातून खून – गुन्हे शाखेने पकडले

जुन्या वैमनस्यातून खून - गुन्हे शाखेने पकडले

श्रीश उपाध्याय/मुंबई

जुन्या वैमनस्यातून सांताक्रूझ परिसरात झालेल्या खुनाच्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
28 सप्टेंबर रोजी सांताक्रूझ पश्चिम येथील डायग्नोस्टिक सेंटरसमोर राजेश शुक्ला यांची हत्या करण्यात आली होती. एफआयआर क्रमांक ८२७/२०२३ अन्वये सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा 9 वर देण्यात आली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर खुनाचा आरोपी जयशंकर मिश्रा किंग्ज सर्कलजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जयशंकर मिश्राला अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात दिले.
सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उप पोलीस आयुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखे ९चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button