बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

जवाहर बाल मंच महाराष्ट्र समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर.

जवाहर बाल मंचच्या माध्यमातून मुलांमध्ये काँग्रेस विचार रुजवण्याचा प्रयत्न.

मुंबई, दि. ३० सप्टेंबर

जवाहर बाल मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. हरी यांनी जवाहर बाच मंच महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. राज्य समन्वयक म्हणून साजेश नंबियार, आशय गुने, नितीन बगे, रुशल हिना, दपक खानसे, तुषार जाधव, अजित पेंटर,गार्गी सपकाळ, सोनाली धाडे, अनिरुद्ध रोटे, अमानुल्ला पटेल, फरझाना डांगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जवाहर बाल मंच महाराष्ट्रच्या मुख्य समन्वयक म्हणून नीला निमये या काम पहात आहेत.

जवाहर बाल मंचच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना आपल्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची बहुलतावादी संस्कृती आणि लहान मुलांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार पहिल्यापासूनच रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय स्तरावर जवाहर बाल मंचच्या स्थापनेनंतर प्रत्येक राज्यांमध्येही संघटनात्मक रचना तयार केली जात आहे. यानंतर जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरही जवाहर बाल मंचच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचण्याचा काँग्रेसचा विचार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button