कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना गुन्हे शाखेने पकडले
कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना गुन्हे शाखेने पकडले
श्रीश उपाध्याय/मुंबई
बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखा ३ ने पर्दाफाश करत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे.
एका व्यक्तीला कर्ज देण्याच्या नावाखाली काही लोकांनी त्याच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले आणि कर्जही दिले नाही, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. तक्रारीच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की एका टोळीचे लोक बनावट कागदपत्रे बनवून क्रेडिट कार्ड आणि बँकांकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना विकत होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ग्राहक आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ४ पुरुष आणि ३ महिलांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त अमोघ गावकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.