महाराष्ट्रमुंबई
Trending

भाजपकडून लोकशाहीचा आवाज दाबण्याचे काम

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ उखळण्याचा भाजपचा डाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे

मुंबई- दि.25 सप्टेंबर

देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ उखळण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी अहमदनगर मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पत्रकारान संदर्भात केलेल्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी चांगला समाचार घेतला भारतीय जनता पार्टी मुळात लोकशाही विरोधात काम करणारा पक्ष आहे .देशात आणि राज्यांमध्ये पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींवर सातत्याने दबाव आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी केलेले वक्तव्यावरून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ उखाळून टाकण्याचं काम भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधात असलेल्या मतांना आणि त्या व्यक्तींच्या विचारांना देखील तेवढेच महत्त्वाचे स्थान देण्यात येत असते. मात्र भारतीय जनता पार्टी पक्षाने केवळ लोकशाही विरोधात काम करण्याची भूमिका अनेक प्रकरणावरून दिसून येत आहे. भाजपा विरोधात बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना अथवा सर्वसामान्य व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी अहमदनगर मध्ये पत्रकारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टी लोकशाहीला मानत नाही. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ उखाळून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. असे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. परंतु आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदार भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button