संगमनेरमध्ये अतिरिक्त उत्खनन केल्या प्रकरनी 57 स्टोन क्रेशर चालकांना 765 कोटी रुपयांचा दंड
संगमनेरमध्ये अतिरिक्त उत्खनन केल्या प्रकरनी 57 स्टोन क्रेशर चालकांना 765 कोटी रुपयांचा दंड
संगमनेर तालुक्यातील दगड खानपट्टा आणि स्टोन क्रेशर चालकांनी अतिरिक्त उत्खनन केल्याने संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी या 57 स्टोन क्रेशर आणि खानपट्टा चालकांना 765 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, यामुळे संगमनेर तालुक्यात अवैद्य खानपट्टा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हे सर्व खानपट्टाधारक उपोषणाला बसणार होते, मात्र आपल्याला कोणतीही म्हणणं मांडण्याची संधी न दिल्याचा आरोप या दगडपट्टा खानचालक मालकांनी केला होता.हा आरोप तहसीलदार अमोल निकम यांनी खोडून काढला आहे ,शिर्डीचे प्रांताधिकारी आणि श्रामपूरचे प्रांताधिकारी यांनी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी वेळेत आपले म्हणणे सादर न केल्याने त्यांना बाजारभावापेक्षा पाच पटीने अधिक दंड थोठविण्यात आला आहे, राज्यात 765 कोटी रुपयांचा दंड ठोठल्याने खानचालक आणि स्टोन क्रेशर चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे संगमनेर तालुक्यात सात दगडपट्टा खान चालकांची मुदत असून 26 पैकी 19 जणांची मुदत संपली आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.