अकोले तालुक्यातील जाचकवाडी गावातील शिवारात अंकुश रानु लामखडे (वय वर्ष ५७ )रा. केळवाडी, ता. संगमनेर यांची दोघा तरुणांनी मिळून हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी जाचकवाडी येथील शिवारातील घराजवळ असलेल्या टोमॅटो पिकाच्या फडात मृतदेह गाडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ नोव्हेंबर रोजी लामखडे आपल्या मोटर सायकलवर दुपारच्या सुमारास जाचकवाडी गावातील बारकू उर्फ भाऊसाहेब महाले यांचे शेतातील घरी आपले हात उसने दिलेले पैसे मागण्यासाठी आले असता अशोक फापाळे रा.बेलापुर तालुका अकोले व भाऊसाहेब महाले रा. जाचकवाडी, ता. अकोले या दोघांनी लामखडे यांची निर्घृणपणे हत्या केली.व मृतदेह टोमॅटो पिकाच्या फडात गाडून टाकला.तर मोटर सायकल उसाच्या फडात लपवून ठेवली होती. लामखडे घरीच आले नाही .म्हणून लामखडे कुटुंबाने शोधाशोध केली परंतु रात्री ते घरी न आल्याने त्यांनी अखेर घारगाव पोलिस स्टेशन गाठत हरवल्याची तक्रार दिली.घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कैलास देशमुख यांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर आरोपी पर्यंत पोहचले परंतु आरोपी देखील पोलिस तसेच लामखडे कुटुंबासोबत त्यांचा अंकुश लामखडे यांचा शोध घेण्याचा बनाव करत होते. दोन दिवसभर घारगाव पोलिसांना गुंगारा देत तसेच शोधाशोधीचा बनाव करतं पोलिसांची दिशाभुल करत गेले.परंतु लामखडे यांचे कुटुंबाने तेथील सर्व परिसर पिंजून काढला अखेर त्यांना त्यांची मोटर सायकल ऊसाच्या शेतात मिळून आल्याने संशय बळावला. पोलिस कैलास देशमुख यांनी भाऊसाहेब महाले याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला अखेर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव देखील सांगितले अधिक तपास करत अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे तसेच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शनानुसार अकोले पोलिस व घारगाव पोलिसांनी सापळा रचून अशोक फापाळे यास रात्री ९ वाजेच्या दरम्यान अटक केली आहे.तर दोन्ही आरोपी अकोले पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दोघांनी लामखडे यांच्या डोक्यात खोरे मारुन तसेच गळ्याला मखमल आवळून ठार केले असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.तसेच भाऊसाहेब महाले याने घराजवळच खंडाणी घेतलेली जमिनीतील एका टोमॅटोच्या पिकाच्या शेतात ३ फूट खड्डा घेऊन मृतदेह रात्रीतून पुरून टाकला. हे दोघे कांदे घेऊन ते विकण्याचा व्यवसाय करत होते. कांदे खरेदीसाठी यांनी लामखडे यांच्याकडून हातउसनी रक्कम घेतली होती. वेळोवेळी पैसे माघुनही आरोपींनी पैसे दिले नाही.परंतु लामखडे यांनी तगादा लावल्याने दोघांनी अखेर कट रचून त्यांची निघूनपने हत्या केल्याची बाब समोर आली आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून पुढील तपास अकोले पोलिस करत आहे.