Uncategorizedअमरावतीअहमदनगरऔरंगाबादकरमणूकक्रीडाजळगावनंदुरबारपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले

उद्धव ठाकरेंची सभा होताच कार्यकर्ते आक्रमक

बुलढाणा –

शिंदे गटात गेलेले बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांकडून काल रात्री फाडण्यात आले आहेत. काल बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीत उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केले.उद्धव ठाकरेचे भाषण संपताच बाहेर पडलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी सभास्थळाबाहेर लावलेले शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले आहेत..

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेनंतरच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया उमटल्याचा पाहायला मिळतय. कालच खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस झाला या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते.

 

उद्धव ठाकरेंच्या सभास्थळा बाहेर सुद्धा हे बॅनर मोठ्या संख्येत लावण्यात आले होते.सभेला येतेवेळी शिवसैनिकांनी या बॅनरला काहीही केलं नाही.मात्र उद्धव ठाकरेंची सभा संपल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.शिवसैनिकांनी आपला राग या बॅनर वर काढून खासदार प्रतापराव जाधव यांचे बॅनर फाडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button