क्राईमजळगाव
Trending

चोपड्यात चार गावठी कट्ट्यांसह आठ लाखाच्या मुद्देमाल जप्त

चोपड्यात चार गावठी कट्ट्यांसह आठ लाखाच्या मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांना मिळालेले गोपनीय माहिती वरून शिर्डी येथील काही इसम मध्ये प्रदेश येथे गावठी कट्टे घेऊन चोपडा मार्गे शिर्डी येथे परत येणार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपनीय माहितीनुसार सापळा रचुन सदर गाडीची तपासणी केली असता त्यात चार गावठी बनावटीचे कट्टे 10 जिवंत कार्टूस होंडा कंपनीची गाडी मोबाईल असे आठ लाख आठ हजार तीनशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई मध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे तर एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला आहे. सदर कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री झाल्याने संपूर्ण चौकामध्ये बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती चोपडा शहर पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदर ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी नजन किसन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सानेगुनी शाखेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केले आहे पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे करीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button