मी रिक्षावाला,मी मुख्यमंत्री !
डोंबिवलीत रिक्षावाल्यांची बॅनर बाजी
कल्याण –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत येणार असून विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेकडून डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. डोंबिवलीत मधील काही रिक्षावाले एकवटले असून मी रिक्षावाला,मी मुख्यमंत्री अश्या आशयाचे स्टिकर लावत मुख्यमंत्री यांना पाठींबा देत विरोधकांना टोला हाणला आहे.
याबाबत डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याने त्यांना पाठींबा देण्यासाठी सर्वच जणांनी मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री असे स्टिकर लावले आहेत.यावेळी माजी नगरसेवक रणजित जोशी,युवासेना अधिकारी सागर जेधे यांच्यासह सर्व रिक्षा युनियन पदाधिकारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते.