अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकरमणूकजळगावनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

ठाणे मनपा निवडणुकीत उतरणार आप;

पत्रकार परिषदेतुन दिली माहिती

ठाणे-

आपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून ठामपा निवडणुक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पार्टी आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करुन ठाणे मनपा वर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे इतर पक्षांना अडचण होऊ शकते. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ठाणेकरांना नवा पर्याय देण्याकरिता जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात ‘आप’ संघटन विस्तारास अधिक गती मिळण्यासाठी आज नवीन कमिटीचे गठन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार आहे.

‘आप’ ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत कार्यकर्त्यांनी केलेल्या जनसंपर्कातून असे आढळले की,ठाणेकर सध्याच्या पालिका कारभारापासून त्रस्त असून योग्य पर्याय म्हणून आम आदमीकडे मोठ्या आशेने पहात आहे. येत्या ठा.म.पा निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व स्तरातील ठाणेकरांना पक्षाची उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्यानंतर ठाणे शहर उपाध्यक्ष संदेश विचारे म्हणाले की, कट्टर देशभक्ती, कट्टर मानवता, कट्टर ईमानदार या त्रिसूत्री वर आमचा पक्ष उभा आहे त्यामुळे आम्ही सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमा या निकषांवर ईच्छुकांची मुलाखत घेऊन उमेदवारांची सुची आम्ही जाहीर करणार आहोत. ठाणे पालघर जिल्हा सचिव मधुकर फर्डे यांनी सांगितले की, ठाणेकरांनी एक संधी दिली तर निश्चितपणे रस्त्यांवरील खड्डे, मनपा मधील भ्रष्टाचाराचे अड्डे साफ करु तसेच म.न.पा शाळेचा दर्जा, वाहतूक कोंडी इ. जनतेच्या समस्यांचे निवारण करु.

ठाणे पालघर जिल्हा संयोजक विजय पंजवानी म्हणाले की, दिल्ली / पंजाब प्रमाणे ठाण्यातील जनतेला सुद्धा पाणी पट्टी, विज, दर्जेदार शिक्षण व आरोग्य मोफत देण्यासाठी ठाणेकरांनी ‘आप’ ला एकहाती सत्ता द्यावी.

भष्ट्राचार मुक्त ठाणे हाच आमचा संकल्पनेवर ठाणेकर आम्हांला प्रतिसाद देतील याची खात्री आहे.

BYTE : राकेश आंबेकर ठाणे शहर अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button