Uncategorizedक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईव्हिडीओ
Trending

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने डोंबिवलीत एकाची हत्या;

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण

डोंबिवली पेंडसे नगर परिसरात राहणार जयेश जाधव याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटल्याने त्याच्या मृत्यू झाला.त्याच्याच मित्र बकुळ चौधरी याने त्याला सिगारेट आणायला सांगितली होती.आणण्यास मनाई केली असता त्याला मारहाण करण्यात आली,याचं मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवलीत राहणार जयेश जाधव याला त्याच्याच मित्राने सिगारेट आणून न दिल्याने मारहाण करत डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटले याचं मारहाणीत जयेशचा मृत्यू झाला आहे.ही मारहाण जवळील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून,त्याअनुषंगाने रामनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करत हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने आरोपी बकुळ चौधरी याला चोळेगाव येथून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बाईट :- सचिन सांडभोर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button