सातारा
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरी बरोबरच आणखीन दोन कबरी सापडल्या असून या दोन कबरी नेमक्या कोणाच्या असा प्रश्न सातारा जिल्हा प्रशासनाला पडला आहे त्यामुळे जुने दस्ताऐवज तपासण्यासाठी पुरातन खात्याने काम सुरू केले आहेत.
शिवकालीन इतिहासामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर त्याची कबर तेथेच निर्माण केली होते तर त्याचा साथीदार असलेल्या सय्यद बंडाला देखील त्याच्या शेजारीस दफन करण्यात आले होते असा इतिहास आहे.मात्र या दोन कबरी बरोबरच आता आणखी दोन कबरी देखील या परिसरामध्ये सापडल्या असल्याने या कबरी नेमक्या कोणाच्या याचा शोध आता जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहेत.
नव्याने सापडलेल्या दोन कबरी या इतिहासकालीन आहेत का याचा दस्ताऐवज देखील शोधण्याचे काम पुरातन विभागाने हाती घेतले असून ज्यावेळेला अफजलखानाच्या कबरी भोवती अतिक्रमण करण्यात आले त्या वेळेला तर या कबरी बांधण्यात आले नाहीत ना असा देखील तपास सातारा जिल्हा प्रशासन घेत असून त्याची माहिती मिळाल्यानंतरच सातारचे जिल्हाधिकारी याबद्दल स्पष्ट भूमिका मांडणार असून त्याबद्दलची माहिती देखील त्यांनी माध्यमांना दिली आहे.
शिवप्रताप दिनाच्या दिवशीच राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी शेजारील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याच्या आदेश सातारा जिल्हा प्रशासनाला दिले होते त्यामुळे अवघ्या 24 तासांमध्ये सातारा जिल्हा प्रशासनाने अफजल खानाच्या कबरी परिसरातील सर्व अतिक्रमण हटवले त्याच वेळेला या दोन अन्य कबरी या अतिक्रमणाचा मलब्या खाली सापडल्या आहेत.
सध्या या कबरी नेमक्या कोणाचा आहेत याचा तपासता सातारा प्रशासनाच्या माध्यमातून पुरातत्व विभागाने सुरू केला आहे.