बातम्याबीडमहाराष्ट्र

कुत्रा भुंकला म्हणून थेट बंदुकीच्या गोळीने केले ठार

कुत्रा भुंकला म्हणून थेट बंदुकीच्या गोळीने केले ठार

बीडच्या परळीतून एक संताप आणि चीड आणणारी घटना समोर आलीय. कुत्रा भुंकला म्हणून एकाने थेट कुत्र्याला बंदुकीने गोळ्या झाडून ठार केले. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.धर्मापुरी फाटा येथे विकास बनसोडे यांचं हॉटेल आहे. आणि याच ठिकाणी निग्रणीसाठी त्यांनी काही कुत्रे पाळले आहेत. मात्र इथला एक कुत्रा रामराज घोळवे यांना भुंकला म्हणून त्याने थेट कुत्र्यावर गोळ्या झाडून ठार मारलं आहे. कुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणारा व्यक्ती माजी कृषी अधिकारी असल्याचं समजते.दरम्यान घटनेनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात रामराज घोळवे वर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button