बातम्यामहाराष्ट्र
Trending

माजी मंत्री जयंत पाटील यांनी घेतली खा.उदयनराजे भोसले यांची भेट

माजी मंत्री जयंत पाटील यांनी घेतली खा.उदयनराजे भोसले यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील हेवी वेट नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी भेट देऊन त्यांची अचानकच घेतलेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणामध्ये अनेक तर्क वितरकांना उधान आले आहे
खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर अनेकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी खासदार उदयनराजेंवर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल अनेकवेळा टीका केली होती त्यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांची वाक युद्ध संपूर्ण राज्याने अनेकदा अनुभवले आहे मात्र असे असताना देखील दोन्ही हेवी वेट नेते आज अचानकच एकत्र आल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला
राष्ट्रवादी पक्षात असताना देखील अनेकदा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट टाळणारे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चक्क जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याने खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्यात नक्की कोत्या विषयावर गोपनीय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही
या दोन नेत्यांची झालेली ही भेट भविष्यकाळातील कोणते वेगळे राजकारण घडवणार तर नाहीना अशा तर्क वितरकांना उधाण आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button