बातम्यामहाराष्ट्र
यवतमाळ – शासकीय निवासी आश्रमशाळेत सुविधांचा अभाव : आमदार मदन येरावार यांच्याकडून अधिकार्यांची खरडपट्टी
यवतमाळ - शासकीय निवासी आश्रमशाळेत सुविधांचा अभाव : आमदार मदन येरावार यांच्याकडून अधिकार्यांची खरडपट्टी
पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत सात शासकीय निवारी आश्रम शाळा व वस्तीगृह आहे. याठिकाणी सुविधांचा भाव असल्याची बाब भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आमदार मदन येरावार यांची भेट घेत माहिती दिली. यावेळी आमदार येरावार यांनी प्रकल्प अधिकार्यांशी मोबाइलवर संपर्क साधून जाब विचारच तीव्र शब्दात खरडपट्टी काढली.पुसद प्रकल्प कार्यालयातंर्गत सात निवासी आश्रम शाळा तसेच वस्तीगृह येतात. याठिकाणी मुला-मुलिकरीता कुठलिही सुविधा नाही. निवास, भोजन व वर्ग एकाच खोलीत आहे. आदी समस्यांचा पाढा डॉ. आरती फुफाटे यांनी मांडला. आमदार येरावार यांनी दखल घेत पुसद येथील आदिवासी प्रकल्प अधिकार्यांशी संपर्क साधत अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले.