बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी कवी गितकार प्रा. प्रवीण दवणे

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद “गीत नवे गातो मी” पुस्‍तकरुपात लवकरच

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत पुस्‍तकाची घोषणा

मुंबई, दि. 16 ऑगस्‍ट

भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद मराठीतील ख्‍यातनाम कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केला असून त्‍याचे पुस्‍तक लवकरच प्रकाशि‍त करण्‍यात येईल, अशी घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी कवी गितकार प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.
भाररत्‍तन अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या स्‍मृतीदिना निमित्‍त आज वांद्रे येथील “प्रतीभांगण या ग्रंथालयात” घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्‍यात आली. यावेळी अनुवादक प्रा. प्रवीण दवणे, प्रकाशक व ग्रंथालीचे विश्‍वस्‍त सुदेश हिंगलासपुरकर आदी उपस्थित होते.

वर्षभ्‍रापुर्वी विलेपार्ले येथे झालेल्‍या एका जाहीर कार्यक्रमात प्रा. प्रवीण दवणे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या काही कवितांचा मराठी अनुवाद सादर केला होता. त्‍यावेळी उपस्थित असणा-या आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रा. दवणे यांना विनंती केली की तुम्‍ही अटलीजींच्‍या सगळया कवितांचा अनुवाद करावा, त्‍यानुसार त्‍यांनी हे काम एक प्रकल्‍प म्‍हणून हाती घेऊन गेली सात आठ महिने परिश्रम करुन पुर्ण केले आहे. त्‍याचे पुस्‍तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्‍यात येणार आहे. आज या पुस्‍तकाची घोषणा करण्‍यात आली असून त्‍या पुस्‍तकाचे प्रकाशन दिल्‍लीत करण्‍याचा आमचा मानस असल्‍याचेही यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले.

अनुवादाची भूमिका मांडताना प्रा. प्रवीण दवणे म्‍हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कविता या ओतप्रोत देशभक्‍तीने भरलेल्‍या, अखंड भारताचे स्‍वप्‍न मांडणा-या, तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्‍यांच्‍या कवितांचा अनुवाद म्‍हणजे त्‍यांच्‍या शब्‍दांचा अनुवाद नसून त्‍यांच्‍या हिंदी भाषेवर संस्‍कृतचा प्रभाव असून त्‍यांची कविता ही भावनानिष्‍ठ आहे. मानवतेचा साक्षात्‍कार करणारी त्‍यांची कविता कुठल्‍याही एका पक्षाच्‍या चौकटीत बसणारी नाही. त्‍यामुळे या कवितांचा अनुवाद करताना मोठे आव्‍हान होते, त्‍यासाठी काशीतील एका पंडिताची सुध्‍दा मदत घेतली आणि अटलजींची हिंदी समजून घेतली. त्‍यामुळे हे काम माझ्या हातून नियतीनेच करुन घेतले अशी कृतज्ञ भावनाही प्रा. प्रवीण दवणे यांनी व्‍यक्‍त केली. सगळया माध्‍यमांनी, विद्यार्थ्‍यांनी, पालकांनी, वाचकांनी काय असते समर्पणाचे टोक, काय असते कृतज्ञतेची भावना, काय असते देशभक्‍ती हे समजून घ्‍यायचे असेल तर या कविता नक्‍की वाचायला हव्‍यात, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. ग्रंथालीचे विश्‍वस्‍त सुदेश हिंगलासपुरकर यांनी पुस्‍तकांच्‍या निर्मिती मागची आपली भूमिका मांडली. लवकरच या पुस्‍तकाचे प्रकाशन दिल्‍ली आणि मुंबईत करण्‍यात येईल असे जाहीर करण्‍यात आले आहे. या पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ चित्रकार हेमंत जोशी यांनी केले असून मुखपृष्‍ठाचे अनावरणही यावेळी करण्‍यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button