करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

एमएसएमइच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याकरिता महाराष्ट्र चेंबरने विशेष उपक्रम घ्यावेत : नाम. नारायण राणे

महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस नाम. नारायण राणे राज्यातील प्रमुख उद्योजक व व्यापारी प्रमुखांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : श्रीश उपाध्याय
————————-
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या एक्सपोर्ट संबंधी अडचणींबाबत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या कडून माहिती घेत विस्तारपूर्व चर्चा केली. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. तसेच एमएसएमइच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याकरिता महाराष्ट्र चेंबरने मंत्रालया च्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविण्याचे आवाहन सूक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्री नाम. नारायण राणे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्री नाम. नारायण राणे यांची उद्योग भवन येथे भेट घेतली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांच्या संबंधी विविध अडचणी व या घटकांकडून होणाऱ्या निर्यातीसंबंधी अडचणीची माहिती दिली. तसेच जागतिक स्तरावर राज्यातील व्यापार उद्योगाला संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नुकताच अमेरिका दौरा ही यशस्वीपणे पूर्ण केला व अमेरिका येथे झालेल्या बिझनेस समिटची माहिती दिली. भारत अमेरिका व्यवसाय वृद्धीसाठी इंडिया यूएसए डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. या फोरमच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात वाढीसाठी व जागतिक स्तरावर व्यवसायांची संधी मिळणार असल्याचे सांगितले. तसेच दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे संपन्न होणार्‍या महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठीचे आमंत्रण ना.नारायण राणे यांनी स्विकारले.

फोटो कॅप्शन – सूक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्री नाम. नारायण राणे यांच्या बरोबर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकास योजना संबंधी चर्चा करताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button