Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई मनपाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट एप्प, आपत्तींपासून दूर राहण्यासाठीचे हाय अलर्ट!

मुंबई मनपाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट एप्प, आपत्तींपासून दूर राहण्यासाठीचे हाय अलर्ट!

श्रीश उपाध्याय/मुंबई
——————————-
मुंबई हे महानगर जवळपास दीड कोटी लोकसंख्येचं .रोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांची संख्या आणखी जास्त. एकीकडे या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याचं आव्हान तर दुसरीकडे नैसर्गिक किंवा अन्य आपत्तींच्या वेळी एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या सुरक्षेचाही प्रश्न. हे सारं आव्हानात्मकच. त्यामुळेच मुंबई मनपाने आता मुंबईकरांसाठी एक एप्प लाँच केले आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मोबाइलच्या प्ले स्टोअरवरून डिज़ास्टर मैनजमेंट एमसीजीएम एप्प डाउनलोड करून लोक आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळवू शकतात. या एप्पचा माध्यमातून मुंबईतील पाऊस, भौगोलिक परिस्थिती, आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा आदी सर्व माहिती फोन क्रमांकासह उपलब्ध होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button