महाराष्ट्रमुंबई
Trending

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप कडून शिवसेनेला बदनाम करण्याचे काम

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप कडून शिवसेनेला बदनाम करण्याचे काम

Authored by: रविंद्र भोजने, मुंबई 

——————————-

मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या लवकरच निवडणुका होणार आहेत.सध्या महापालिकेवर प्रशासक आहे.पण येत्या पाच- सहा महिन्यात या निवडणुका होतील.मुंबई महानगर पालिके मध्ये शिवसेनेची सत्ता आहे मात्र,शिवसेनेला सध्या प्रचंड बदनाम करण्याचं काम सुरू आहे.मुंबई महानगर पालिकेमध्ये तीनच पक्ष महत्वाचे आहेत.पहिला शिवसेना दुसरा भाजप आणि तिसरा कॉग्रेस तर चौथा राष्ट्रवादीचा क्रमांक लागतो.

शिवसेना 90
भाजप 82
काँग्रेस 31
इतर – 24

अस यांचं संख्याबळ महानगरपालिकेत आहे. तस पाहिलं तर कुणालाच बहुमत नाही. शिवसेना आणि भाजप यांची पूर्वी युती होती.मागच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले होते. कुणालाच स्पष्ठ बहुमत मिळालं नाही. यामुळे मग शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महानगर पालिकेची सत्ता मिळवली.मात्र , 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुक युतीने लढले. निकाल लागल्या नंतर त्यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने ते वेगळे झालेत. पुढे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. एके काळी युतीने लढणाऱ्या आणि स्वतःला छोटा भाऊ आणि मोठा भाऊ संबोधणाऱ्या या दोन पक्षात आता विस्तव जात नाही. त्यामुळे आता हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाटत नाही.

महापालिकेतील शिवसेना नेत्यांना सतत टार्गेट केलं जातं आहे.शिवसेना नेत्यांच्या घरी , त्यांच्या कार्यलयावर , पालिका कंत्राटदारांवर सतत आय टी विभागाच्या धाडी पडत आहेत.ईडी विभागाच समन्स कुणाच्या घरी कधी पोहचेल याचा नेम नाही. शिवसेना नेते पुरते हैराण परेशान झाले आहेत.

शिवसेनेला आधी केंद्रीय यंत्रणा जेरीस आणत आहेत. त्यानंतर काही चॅनेलवाले त्या बातम्या सतत दाखवून शिवसेनेला अधिक बदनाम करत असतात.

मुंबईत शिवसेना ,भाजप आणि काँग्रेस हे तीनच पक्ष महत्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही प्रमाणात आपली ताकद निर्माण करू शकला असता.मात्र ,त्यांचे खंबीर नेतृत्व असलेले नवाब मलिक हे सध्या जेल मध्ये बंद आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी ला अथक प्रयत्न करावे लागतील. सेनेला बदनाम करून भाजप आपला डाव साधण्याच्या तयारीत आहे. पण त्यांना त्यात किती यश येईल याची खात्री दिसत नाही.

शिवसेनेचे नेते सततच्या IT , ED च्या कारवाईमुळे बदनाम झालेत.तर दुसरीकडे भाजपचे नेते काही धुतल्या तांदळा सारखे स्वछ नाहीत. काँग्रेस पक्षाची ताकद त्यांच्या पारंपरिक दलित , मुस्लिम यांच्या मतांवर आहे. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप पूर्ण ताकदीने लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाच्या दोन चार मंत्र्यांची साथ मिळाली तर ते कदाचित चित्र बदलू शकतात. तर दुपारीकडे भाजपचे नेते ,आमदार, नगरसेवक , कार्यकर्ते निवडणूक कधी ही होवू दे पण त्या आधी ते कामाला लागलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button