भारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

दिलेला निधी ठाकरे सरकारकडून निधी खर्चच नाही, केवळ 0.32 टक्के निधीच वापरला,तिसरी लाट रोखण्यासाठी मोदी सरकारने

दिलेला निधी ठाकरे सरकारकडून निधी खर्चच नाही, केवळ 0.32 टक्के निधीच वापरला,तिसरी लाट रोखण्यासाठी मोदी सरकारने

मुंबई : राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत असल्याचं दिसत आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) दिलेला निधी (fund) खर्चच केला नसल्याचं समोर आलं आहे. केंद्राने दिलेल्या एकूण निधी पैकी खूपच कमी निधीचा वापर महाराष्ट्र सरकारने वापरला असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारसाठी प्रस्तावित एकूण 1,294 कोटी रुपये होते. त्या निधीपैकी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला 683 कोटी रुपये देण्यात आले आणि त्यापैकी केवळ 0.32 टक्के निधीच वापरला असल्याचं पीआयबीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

पीआयबीने म्हटलं, केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 जुलै 2021 रोजी भारत कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-III ला मंजूरी दिली. 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 23,123 कोटी रुपये किमतीची (केंद्रीय हिस्सा – 15,000 कोटी रुपये आणि रा्ज्याचा हिस्सा – 8,123 कोटी रुपये ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काही केंद्रीय क्षेत्र (CS) घटकांसह एक केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे.

भोजपुरी ,हिन्दी ,गुजराती ,मराठी , राजस्थानी ,बंगाली ,उड़िया ,तमिल, तेलगु भाषाओं की पूरी फिल्म देखने के लिए इस लिंक को क्लीक करे:-https://aaryaadigital.com/ ,https://play.google.com/store/apps/details?id=com.MBSAPTech.AaryaaDigital लिंक को डाउनलोड करे

योजनेला मंजुरी मिळाल्यावर लगेचच केंद्र सरकारने कृतीशील उपाययोजना केल्या आणि 22 जुलै 2021 रोजी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या वाट्यापैकी 15 टक्के निधी जारी केला. निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना आगाऊ म्हणून लवकरच जारी करण्यात आला. 24 ऑगस्ट 2021 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6075.85 कोटी रुपये (केंद्रीय वाटा 50 %) आधीच जारी केले गेले आहेत.नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणं आवश्यक आहे. त्याच संदर्भात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला असून मंगळवारी (4 जानेवारी) नव्या 10 हजार 860 रुग्णांची  झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. गेल्या 24 तासांत मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4491 वर पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button