बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई गोवा महामार्गावर बस झाली पलटी,10 प्रवाशी जखमी

मुंबई गोवा महामार्गावर बस झाली पलटी,10 प्रवाशी जखमी

पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे सांगली बस क्रमांक एम एच 40 एन 9164 गंभीर अपघात होऊन भरलेली बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली कोण पुलावरून महामार्गावर जाणार वळण घेत असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली झाडांमध्ये पलटी झाली की बस प्रवाशाची खचून भरली होती. दिवाळी सणासाठी चाकरमानी मुंबईहून गावी जाण्यासाठी या बस मधून प्रवास करत होते या बसमधून तब्बल 46 प्रवासी प्रवास करत होते अपघातानंतर सर्व प्रवासी बस मध्येच अडकून पडली महामार्ग पोलीस केंद्राला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांचे सामान बाहेर काढण्यात आलं या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झालेत तसंच बस चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झालीये जखमी प्रवाशांना उपचारासाठी आय आर बी रुग्णवाहिकेने एमजीएम कळंबोलीतील दवाखान्यात दाखल करण्यात आलाय महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत करत सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढलं भांबावलेल्या प्रवाशांना आधार देण्याचं मुलाचं कार्य महामार्ग पोलिसांनी केलं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांना पर्यायी वाहनांची देखील व्यवस्था करून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button