महाराष्ट्रमुंबई
Trending

नसीम खान यांनी घाटकोपर मधील विविध समस्या संदर्भात एन विभाग अधिकाऱ्यासोबत घेतली बैठक

नसीम खान यांनी घाटकोपर मधील विविध समस्या संदर्भात एन विभाग अधिकाऱ्यासोबत घेतली बैठक

मुंबई

घाटकोपर क्षेत्रामधील मनपा एन विभागाशी संबंधित विविध समस्यांबाबत आज माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी घाटकोपर (पू) एन विभाग सहायक पालिका आयुक्त (प्रशासक) श्री. गजानन बेलाळे यांच्या दालनात पाणी खाते, रस्ते विभाग, इस्टेट विभाग व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली.


नसीम खान यांनी बैठकीत घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर, पारसीवाडी, पंखे शाह दर्गा येथे होत असलेली पाणी टंचाई, चिराग नगर येथील रस्ता रुंदीकरण, विक्रोळी पार्कसाईट येथील ट्विन हाऊसला बेकायदेशीर आकारण्यात येणारा दंड तसेच घाटकोपर (पू) मधील हिंगवाला लेन येथील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि घाटकोपर (पूर्व आणि पश्चिम) मधील विविध रस्ते रुंदीकरणाच्या समस्या आणि मनपा एन विभागातील विविध विभागातील अधिकाऱ्याकडून कामात होत असलेली दिरंगाई अशा विविध विषयावर सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर एन विभागाचे सहायक पालिका आयुक्त श्री. बेलाळे यांनी नसीम खान यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांची गंभीर दखल घेऊन येत्या ८ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सदर बैठकीत मुंबई कॉँग्रेस सचिव रामगोविंद यादव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष समीर अख्तर, ब्लॉक अध्यक्ष खलील खोत, कालू रेहमान, प्रेम यादव, जावेद आमिन, अली हसन, अल्ताफ मुंशी, रमेश कांबळे, नासिर गोहर खान, कमलेश कापसी, जमीर अब्बासी आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button