उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस नेते नसीम खान यांची सुप्रीम कोर्टात धाव
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस नेते नसीम खान यांची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई : प्रतिनिधी व्यक्तिगत कारणास्तव न्याय मिळावा यासाठी माजी मंत्री तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक शिवसेना उमेदवार दिलीप लांडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपूनही त्यांनी प्रचार सुरू ठेवला होता असा आरोप नसीम खान यांनी केलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नसीम खान हे निवडणूक लढत होते तर शिवसेनेच्या वतीने दिलीप लांडे उमेदवारी लढवत होते. सदरच्या निवडणुकीमध्ये हार पत्करल्यानंतर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सदरची याचिका रद्द करण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.