क्राईमनागपूर
Trending

सदर ठान्याच्या हद्दित घडली पुन्हा हत्येची घटना

सदर ठान्याच्या हद्दित घडली पुन्हा हत्येची घटना

शहराच्या सदर ठाण्याच्या हद्दीत पुन्हा हत्येची घटना समोर आली आहे । या घटनेत छोट्याश्या वादावरून सुरू झालेल्याब शिवीगाळीवरून मित्राने आपल्याच मित्राची चाकूने भोसकून हत्या केली। मृतक 25 वर्षीय प्रणय राजेश पात्रे असून तो बाराखोली परिसरात राहणारा होता तर आरोपी 23 वर्षीय सत्यनत्र यादव हा मानकापूर निवासी आहे। प्रत्यक्ष दर्शींच्या मते हे दोघे ही मित्र असून आज सकाळी 11 वाजता च्या दरम्यान गड्डीगोदाम चौक च्या मायकल शाळेच्या समोर दारु च्या नशेत बसले होते दरम्यान काही कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातच सत्यन्द्र ने प्रणय च्या पोटावर चाकूने वॉर करून त्याची हत्या केली । पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचून मृतदेहास मेयो रुग्णालयात हलविले। सदर पोलीसांनी आरोपीला अटक करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button