महाराष्ट्र

मॅरेथॉन स्पर्धेत धावत तरुण तरुणींनी केले नववर्षाचे स्वागत

मॅरेथॉन स्पर्धेत धावत तरुण तरुणींनी केले नववर्षाचे स्वागत

नववर्षाची पहाट आणि गुलाबी थंडीचा आनंद खऱ्या अर्थाने बारकुंड गावाच्या पंचक्रोशितील तरुण तरुणींनी घेतला. निमित्त होतं ते म्हणजे इंदुबाई भदाने प्रतिष्ठान आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे, धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
2022 या सरत्या वर्षाला निरोप देत सन 2023 चे संपूर्ण देशभरात आणि जगभरात उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत असून स्पर्धेत 500 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. मुलांसाठी 18 किलोमीटर तर मुलींसाठी 11 किलोमीटर धावण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती.
या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या नववर्षाच्या मॅरेथॉन स्पर्धेला आंतरराष्ट्रीय खेळाडू कांतीलाल कुंभार यांनी देखील हजेरी लावत धावपटूंना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धेच्या माध्मातून शासकीय नोकरी मिळवता येते, यामुळे क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक संजय बारकुंड उपस्थित होते, तसेच क्रीडा महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने विशेष महेनत यावेळी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button