महाराष्ट्रमुंबई
Trending

धर्मवीर आनंद दिघे ह्यांनी सुरु केलेली रक्तदान शिबिराची प्रथा कायम राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर आनंद दिघे ह्यांनी सुरु केलेली रक्तदान शिबिराची प्रथा कायम राहील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्री च्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून एक वेगळाच आर्दश निर्माण केला. ठाण्यातील शिवाजी मैदान येथे आयोजित ह्या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना रक्तकर्ण देखील देण्यात आला. भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, आनंद दिघे याच्या संकल्पनेतून नवीन वर्षाची सुरवात रक्त दान पासून करत आहोत. कोविड काळात याच ठिकाणी 11 हजार हुन अधिक रक्त दान केले. रक्त दान काहींना जमले नाही. नाहीतर 25 हजार लोकांनी रक्त दान केले असते. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री साह्याता निधी मधे 5 कोटी निधी वाटप केला. सर्वाना फायदा होईल रुग्णांना फायदा होईल असे निधी वाढवत आहे. पोलिसांनी ,महिलांनी देखील रक्तदान केले सर्वांना सुभेच्छा देतो. या ठिकाणी गाजा वाजा करत , स्वतःहून रक्त दान करत आले आहे. एका दिव्यांग यांनी 121 वेळा रक्त दान केले 25 राज्यात रक्त दान केले. त्यांचे अभिनंदन असे अनेक रक्त दाते हे आपल्याला खऱ्या अर्थाने रक्त दान करत आहे. सर्व जणांना सुभेच्छा देत दिव्यांग प्रकाश नाडर याचे मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के सह पोलिस उपायुक्त डॉ विनय कुमार राठोड आणि गणेश गावडे यांनी देखील रक्त दान केले. नवीन वर्षाच्या माध्यमातून राज्य प्रगती पथावर जाणार असल्याचे तसेच नवीन प्रकल्प राज्यात सुरु करण्यात येणार आहेत असे सांगून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button