मुकेश अंबानींकडून खंडनीची मागणी
प्रत्येक वेळी जीवे मारण्याच्या धमक्या येतात आणि खंडनीची रकम दुप्पट होतो.
श्रीश उपाध्याय
मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आठवड्यातून तीनदा
खंडनी साठी ईमेल केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी खंडनी मागणाऱ्या शादाब खानने खंडनिची रक्कम दुपट्ट वाढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी शादाब खानने मुकेश अंबानींच्या ईमेलवर लिहिले होते की, 100 कोटी रुपये खंडणी म्हणून दे नाहीतर त्यांची हत्या करू.
मुकेश अंबानींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, शादाब खानने दुसऱ्या दिवशी 28 ऑक्टोबर रोजी पुन्हा धमकीचा ईमेल लिहिला आणि साप्ताहिक रक्कम 200 कोटी रुपये केली.
यावेळीही प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे नाराज झालेल्या शादाबने 30 ऑक्टोबरला तिसऱ्यांदा ईमेल केला आणि लिहिले – तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी आमचा स्नाईपर तुम्हाला मारू शकतो. 400 कोटी रुपये द्या नाहीतर तुला मारून टाकीन. पोलिस मला शोधू शकत नाहीत आणि पकडू शकत नाहीत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावदेवी पोलिसांनी कलम ३८७ व ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल बेल्जियममधून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना ईमेल्सची चौकशी करण्याची विनंती केली आहे.