आदरणीय शरद पवारसाहेबांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य ;राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन…
दादा भुसे मुर्दाबाद...दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय
आक्षेपार्ह वक्तव्य तपासून रेकॉर्डवरुन काढण्यात येईल ;विधानसभा अध्यक्षांची माहिती…
मुंबई
दि. २१ मार्च –
पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.
आदरणीय शरद पवारसाहेब यांच्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादा भुसे यांनी आदरणीय शरद पवारसाहेबांचे नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करा अशी मागणी केली.
दादा भुसे यांनी वक्तव्य केले ते माध्यमांपर्यत गेले आहे त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.
दरम्यान शरद पवारसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर ते रेकॉर्डवरुन काढण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.